आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावड आणि पिंपळ ही 24 तास प्राणवायू देणारी झाडे आहेत. अलिकडे अनेक कारणांनी वडाची झाडे कमी होत आहे. उद्या वटपौर्णिमा साजरी होत आहे. या खास दिनाचे औचित्य साधून निसर्ग विज्ञान संस्थेने भारत विकास परिषदेच्या दक्षिण पश्चिम शाखेच्या सहकार्याने सोमवारी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 महिलांना 75 वडाची रोपे वितरीत करणार आहे.
महिलांना दिला संदेश
या महिलांनी ही रोपे वर्षभर घरी वाढवायची आहे. त्या नंतर आजूबाजूच्या परिसरात लावायची आहे. परिसरात जागा नसल्यास महिलांनी रोपे निसर्ग विज्ञान संस्थेला परत दिल्यास संस्था ही रोपे लावून त्याचे संगोपन करणार असल्याची माहिती संस्थेचे विजय घुगे यांनी दिली आहे.
महिलांनी साकारला अनोखा उपक्रम
वटसावित्रीला अनेक महिला वडाच्या फांदीची पूजा करतात. तसे न करता वडाचे रोप वाढवून ते लावावे म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याचे घुगे यांनी सांगितले. या संदर्भात सातत्याने जनजागृती केली जाते. पूर्वी प्रत्येक गावात रस्त्याच्या कडेने वड, पिंपळ, कडूनिंब अशी देशी झाडे राहात. ब्रिटिशांनीही ही झाडे तोडली नाही. पण, नंतर प्रत्येक रस्ता व हायवे बांधकामात ही झाडे तोडण्यात आली.
भूमिपूजन करताना लावा हि झाडे
परिणामी झाडांची संख्या खूप कमी झाली आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक रस्ता व हायवेचे भूमिपूजन करताना वड, पिंपळ, कडूनिंबाची रोपे लावावी. तरच पर्यावरण जगेल असे घुगे म्हणाले. निसर्ग विज्ञान संस्थेतर्फे सामुहिक वनहक्क कायद्यातंर्गत स्थानिकांना जंगल हक्क मिळवून देण्याचे काम केले जाते. उमरेड तालुक्यांत 15 ग्रामपंचायतीतील 40 गावांत संस्थेचे काम आहे. या गावांत नैसर्गिकरित्या वाढलेल्या जंगलाचे संरक्षण व संवर्धन केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.