आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पत्नीचा अनैसर्गिक लैंगिक छळ; पोलिस उपनिरीक्षकाला अटक

गोंदिया18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील भरनोली एओपी येथे उपनिरीक्षक पदावर कार्यरत इमरान मुल्ला याच्याविरूध्द फिर्यादी पत्नीने अनैसर्गिक लैंगिक छळ व कुटूंबाकडून हुंड्यासाठी होत असलेल्या जाचाला त्रासून केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी केशोरी पोलिसांनी आरोपी उपनिरीक्षक इमरान मुल्ला याला अटक केली आहे. तर दुसरीकडे इमरान मुल्ला याला अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने जामीन देखील दिले आहे. मात्र या प्रकरणात न्यायासाठी पीडित फियार्दी महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे विनंती केली आहे.सविस्तर असे की, सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी इमरान बाबाजी मुल्ला हा पोलीस विभागात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. ४ वर्षापूर्वी इमरान मुल्लाचे लग्न कर्नाटक राज्यातील आफरीन या युवतीसोबत समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाले. मात्र मुल्ला याचे लग्नापूर्वीच एका महिलेसोबत संबध असल्याचे समोर आले. त्याचबरोबर त्या महिलेच्या उदरी मुल्ला याचा एक मुलगाही आहे. हे प्रकरण समोर आल्याने फियार्दी पीडित आफरीन हिने आरोपी इमरान मुल्ला व त्याच्या कुटूंबाला जाब विचारला.

मात्र, उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली.या प्रकरणाची माहिती झाल्याने आपली बदनामी होईल, या दृष्टीकोनातून इमरान मुल्ला याच्या कुटूंबाने हुंड्यासाठी छळ केले. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील भरनोली येथे राहत असताना फियार्दी पत्नीस अनैसर्गिक लैंगिक कृत्य करण्यास बाध्य केले. त्याचप्रमाणे हुंड्यासाठी मारहाण देखील केली. या प्रकरणाची तक्रार फियार्दी महिलेने तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती. मात्र सातत्याने आरोपी मुल्ला व त्याच्या कुटूंबाकडून छळ होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी महिला माहेरी राहू लागली. सातत्याने होत असलेल्या जाचाला कंटाळून १ सप्टेंबर रोजी फिर्यादी आफरीन हिने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्‍व पानसरे यांची भेट गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. यानुरूप केशोरी पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द कलम ३७७, ४९८ अ, ५०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.या प्रकरणातील आरोपीने केशोरी पोलिसांपुढे आत्मसर्मपण केले. अटकेनंतर केशोरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. मात्र न्यायालयाने आरोपी मुल्ला याला जामीन मंजूर केल्याची माहिती आहे. या प्रकरणात आरोपी इमरान मुल्ला विरुध्द निलंबनाची कारवाई होणार काय? याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...