आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमी युगुलाच्या आत्महत्येचा 24 तासात उलगडा:समाज नाते स्वीकारणार नाही या भीतीने दिला जीव, दोघे होते मावस बहिण-भाऊ

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर दुरांतो एक्स्प्रेसमोर उडी घेत प्रेमी युगुलाने आत्महत्त्या केल्याची घटना गुरूवारी घडली. या प्रकरणाचा उलगडा हिंगणा पोलिसांनी 24 तासात केला. आत्महत्त्या करणारे प्रेमी युगुल मावस बहिण भाऊ होते. समाज आपले नाते स्वीकारणार नाही म्हणून दोघांनी आत्महत्त्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार जितेंद्र नेवारे (32, रा. मानकापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे आणि सुनीता (बदललेले नाव, रा. गोंदिया) असे मुलीचे नाव आहे. जितेंद्र हा बबिताचा नातेवाईक होता. दोघांचे प्रेम संबंध होते. तर जितेंद्रचे यापूर्वी लग्न झाले असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. जितेंद्र हा बाटलीबंद पाण्याचे वितरण करणाऱ्या गाडीवर कार्यरत होता.

टाेकाचा निर्णय घेतला

पत्नी माहेरी गेल्यानंतर जितेंद्र आईसोबत राहत होता. गोंदीयाला राहाणाऱ्या त्याच्या मावस बहिणीचे त्याच्याकडे येणे-जाणे होते. त्यातून दोघांत प्रेम झाले. दोघांनीही लग्न करण्याचा विचार केला होता. पण नातेवाईक आणि समाज आपले नाते स्वीकारणार नाही या भीतीने त्यांनी आत्महत्त्या करण्याचा टाेकाचा निर्णय घेतला.

रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्त्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र त्याच्या मावस बहिणीला भेटायला गोंदीयाला गेला. त्या नंतर ती त्याला भेटण्यासाठी नागपुरला आली. दोघांनी एकमेकांसाेबत वेळ घालवला. त्यानंतर दोघांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्त्या केली.

24 तासात प्रकरणाचा छडा

गुरुवारी हिंगणा परिसरातील गुमगाव-खापरी दरम्यान संदेश सिटीजवळ घटना घडली होती. मुंबई-नागपूर डाउन ट्रॅकवर 20-22 वर्षांचे तरुण ट्रेन क्रमांक 12289 दुरांतो एक्स्प्रेससमोर आले. ट्रेनचा वेग जास्त असल्याने दोघेही जवळपास 500 मीटरपर्यंत ओढले गेले. अपघातात त्यांच्या शरीराचे तुकडे झाले. ट्रेन चालकाने हाॅर्न वाजवूनही दोघे रूळावरून मागे हटले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिली. हिंगणाचे ठाणेदार विशाल काळे हे साथीदारांसह घटनास्थळी पोहोचले. आणि 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला.

बातम्या आणखी आहेत...