आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषदेची उमेदवारी:अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली, विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उर्मिला यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - संजय राऊत

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान आता काँग्रेसनेही उर्मिला मातोंडकरला विधान परिषदेची ऑफर दिली असल्याची माहिती आहे. मात्र उर्मिला यांनी ही ऑफर नाकारली असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. टीव्ही नाइन या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

याविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, 'आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचे या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे' असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

उर्मिला यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - संजय राऊत
उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी देण्यात येईल यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले गोते की, 'उर्मिला मातोंडकरांचा विषय हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. कॅबिनेटचा हा निर्णय आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील'. दरम्यान खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली असल्याचीही माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उर्मिलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असे म्हणत याविषयावर जास्त भाष्य केलेले नाही.