आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात असून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यात सरकारतर्फे युक्तिवाद केला. दोन्ही बाजूने आजचा अंतिम युक्तिवाद होता. या प्रकरणात फिर्यादी रवीकांत कांबळे यांची आई व दीड वर्षाच्या मुलीची १७ फेब्रुवारी २०१८ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.
तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न करून एसीपी बनसोड यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. युक्तीवादा दरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपी विरुद्ध सरकारी पक्षाने सबळ पुरावे कोर्टासमोर सिद्ध केले आहे असे सांगितले.
या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ३५ साक्षीदार पडताळण्यात आले आहे. युक्तीवादाचे मुख्य मुद्दे उज्वल निकम यांनी मांडले. त्यात आरोपींच्या राहत्या घरात व त्यांच्या स्वतःच्या चार चाकी महेंद्र एक्सयूव्ही ५०० गाडीतून उषाबाई कांबळे व राशी कांबळे यांच्या रक्ताचे डाग मिळून आले. तसेच घरातून व गाडीतून मिळून आलेल्या रक्ताच्या डागाच्या नमुन्याच्या अहवाल फॉरेन्सिक चाचणीमध्ये उषाबाई कांबळे यांचा डीएनए सोबत जुळून आल्याचे निष्पन्न झाले आहे, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
इतर अनेक मुद्द्यावरून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याद्वारे युक्तिवाद करण्यात आला. जसे की प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांनी आरोपी गणेश शाहू, अंकित शाहू, गुडिया शाहू यांना घटनेच्या दिवशी दुकानात पाहिले तसेच काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना दोन पोते आरोपीच्या घरच्या जिन्यावरून खाली उतरवून गाडीत टाकताना आणि त्यानंतर ते पोते विहिरगाव नाल्यात फेकताना साक्षीदारांनी पाहिले आहे. आरोपींनी खून करून पुरावा सुद्धा नष्ट केलेला आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. तसेच मृत उषाबाई कांबळे यांच्या अंगावरील दागिने हे आरोपी अंकितने अटक झाल्यानंतर लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून काढून दिले होते हे सुद्धा साक्षीदारांच्या पुराव्यात कोर्टा समोर सिद्ध झालेले आहे.
आरोपींकडून मृतक उषाबाई कांबळे यांचा मोबाईल व आरोपीने वापरलेले शस्त्र साक्षीदारां समक्ष आरोपी गणेशने फेकलेल्या ठिकाणावरून काढून दिले, हे कोर्टा समोर साक्षीदारामार्फत सिद्ध झाले आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.
युक्तिवादाच्या अंतिम टप्प्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोर्टाला असे सांगितले की सर्व आरोपींनी सूडबुद्धीने, गुन्हेगारी कट रचून, संगमतपने दीड वर्षाच्या चिमुकलीचा व तिच्या आजीचा गळा कापून निर्घृणपने खून करून त्यांचे मृतदेह पोत्यात टाकून गाडीतून नेऊन नाल्यात फेकले व पुरावा नष्ट केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.