आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा:वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा, कृषी उत्पादने करमुक्त करण्याची मागणी

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

दिल्ली स्थित बांधकामाधीन सेंट्रल विस्टा बिल्डिंगवर उभारलेल्या भारतीय राजमुद्रेच्या प्रतिकृतिचे विद्रुपीकरण तथा स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने यावर केंद्र शासनाने लादलेल्या जीएसटीविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली.

पोलिसांनी मोर्चा थांबवला

शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. व्हेरायटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शहराध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणारा मोर्चा पोलिस प्रशासनाने संविधान चौकातच थांबवला. त्यानंतर प्रतिनिधिमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

वंचित बहुुजन आघाडीने मागणी केली की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत सरकारने लोटू नये. १८ जुलैपासून अनेक दैनंदिन वस्तुंसाठी पैसे मोजावे लागत आहे. आजवर करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादनांवरदेखील जीएसटी लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महागाईत आणखी वाढ झालेली असल्याने अवाजवी दरवाढ रद्द करण्यात यावी.

आंदोलनात शहराध्यक्ष रवी शेंडे, राजू लोखंडे, अरविंद सांदेकर, विलास वाटकर, किशोर घरत, संगीता गोधनकर, धर्मेश प्रसेनजित, राहुल दहीकर, संजय सूर्यवंशी, प्रविण पाटील, गणेश हरकंडे, विजय पाटील, लक्ष्मण बागडे, बबन वानकर, प्रतिमा शेंडे, कांचन देवगडे, नलिनी खांडेकर तसेच नागपूर शहर व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...