आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Vasant Moon's Name Omitted In Marathi Translation Of Shreyavad For Problem Of Rupee; Clarification Sought By The Directorate Of Higher Education

आंबेडकरांच्या पुस्तकासाठी श्रेयवाद:‘प्रॉब्लेम ऑफ रूपी'च्या अनुवादात मून यांचे नाव वगळले; शिक्षण संचालनालयाने मागितले स्पष्टीकरण

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या मूळ इंग्रजी ग्रंथाच्या मराठी अनुवादात वसंत मून यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्याची दखल घेत उच्च शिक्षण संचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवांना स्पष्टीकरण मागितले आहे.

नेमके प्रकरण काय?

प्रॉब्लेम ऑफ रूपी या मराठीत अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन 16 डिसेंबर 2021 रोजी उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झाले. हा ग्रंथ 13 वर्षांपासून प्रकाशनअभावी पडून होता. ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ इंग्रजी खंड-6 च्या मराठी अनुवादानंतर प्रकाशित खंडात तत्कालीन सदस्य सचिव वसंत मून आणि डॉ. कृष्णा कांबळे यांचे नाव वगळण्यात आले. वर्धेचे प्रा. डॉ. विजय कविमंडन यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. यामध्ये संपादक म्हणून समितीचे सदस्य सचिव प्रा. डॉ. प्रदीप आगलावे यांचे नाव छापण्यात आले आहे. यासंदर्भातील तक्रार भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बंसोड यांनी उच्च शिक्षण व संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडे केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण संचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रदीप आगलावे यांना स्पष्टीकरण मागितले आहे.

म्हणे, ही नियमित प्रक्रिया...

या संदर्भात डॉ. प्रदीप आगलावे यांच्याशी संपर्क साधला असता स्पष्टीकरण मागणे ही नियमित प्रक्रिया असल्याचे सांगितले. शिक्षण संचालनालयाला एखाद्याने पाठवलेल्या पत्रावर स्षष्टीकरण मागितले जाते. आम्ही त्यावर खुलासा करतो. प्रकाशन समिती वेगाने काम करण्याच्या प्रयत्नात असताना काही लोकांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. पण, आम्ही हेही सकारात्मकतेने घेऊ, असे डॉ. आगलावे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...