आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींची चौकशी:विदर्भातील काँग्रेस नेत्यांचे नागपुरातील ईडी कार्यालयासमोर धरणे, केंद्राच्या दडपशाहीचा निषेध

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीचा निषेध करत नागपूरमध्ये सकाळपासून विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी ईडी कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी काँग्रेसकडून केंद्राच्या दडपशाहीबद्दल तीव्र शब्दांत रोष व्यक्त करण्यात आला.

सिव्हिल लाइन येथील ईडी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता झालेल्या धरणे आंदोलनात राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, आमदार सुधीर पारवे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले. क्रीडा मंत्री सुनील केदार मुंबईत सहभागी झाले. तर महिला व बालकल्याण मंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकुर घरी कार्य असल्याने अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

सोनियांना मुदतवाढ

सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीला बोलावण्यात आले होते. परंतु कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागून घेतली. दरम्यान काँग्रेसने या नोटिशीवर प्रत्युत्तर देत पक्ष आणि आपले नेतृत्व घाबरून झुकणार नसल्याचे म्हटले आहे. देशाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध भ्याड कारस्थान रचले जात असल्याचा आरोपही पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले असल्याचा आरोप केला आहे. हुकूमशहा घाबरला हे स्पष्ट आहे. आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी 2,000 कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने 2014 मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...