आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने, (ईडी ) हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवार 13 जून रोजी नागपुरातील ईडी कार्यालयासमाेर विदर्भातील काँग्रेस नेते व कार्यकर्ते धरणे देऊन केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करणार आहे.
सिव्हिल लाइन येथील ईडी कार्यालयासमोर 13 जून रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या धरणे आंदोलनात राज्याचे मंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, अॅड. यशोमती ठाकुर, माजी मंत्री माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार आहे.
सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीला बोलावण्यात आले होते. परंतु कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागून घेतली आहे. दरम्यान काँग्रेसने या नोटिशीवर प्रत्युत्तर देत पक्ष आणि आपले नेतृत्व घाबरून झुकणार नसल्याचे म्हटले आहे. देशाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध भ्याड कारस्थान रचले जात असल्याचा आरोपही पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले असल्याचा आरोप केला आहे. हुकूमशहा घाबरला हे स्पष्ट आहे. आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी 2 हजार कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने 2014 मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.