आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात मागील तीन दिवसात आणखी 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:घोषणेपेक्षा उपाययोजना करण्याची किशोर तिवारी यांची मागणी

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे महाराष्ट्र सरकारने नापिकी, पुरबुडीमुळे झालेल्या नुकसानीचा वाढीव मोबदला देत मुख्यमंत्री किसान योजनेची घोषणा सुद्धा केली आहे. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणीत कमी होत नसून मागील तीन दिवसात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. यामध्ये सुधीर गोलर, रतनलाल धूर्वे, प्रवीण मोरे, गुणवंत मडावी, रोशन माहेकर, सोविंदा राऊत व मारोती नाहगमकर यांचा समावेश आहे.

विदर्भात यावर्षी 1060 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर मागील 13 दिवसात 26 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवी घटना समोर आल्या असून यामध्ये मागील सात दिवसात 14 आत्महत्यांच्या घटना घडल्या आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारला त्याची यादी सादर केली आहे.

धान पट्ट्यातही आत्महत्या

पश्चिम विदर्भातील कोरडवाहू कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत आता पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरीही मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. काँग्रेसचे सरकार असताना रान उठवणारे भाजपाचे नेते आता मूग गिळून आहे. ग्रामीण विदर्भ तसेच मराठवाड्यात काय बिघडले आहे यावर सरकार व प्रशासकीय स्तरावर कोणतीही चर्चा व उपाययोजना होताना दिसत नाही.

समस्यांचे जाण नसणारे सनदी अधिकारी वातानुकूलीत खोलीत बसून फूकट वाटप योजना, कागदावर माफी सवलती घोषीत करून मूळ प्रश्न बाजूला ठेवत असल्यामुळे निरपराथ शेतकऱ्यांचे बळी जात असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. येत्या 13 सप्टेंबरला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन एकदा मारेगाव तालुक्यात भेट देण्याची विनंती करणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली

उपाययोजना करण्याचे आवाहन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार अशी घोषणा केली आहे. तसेच वाढीव मोबदल ,मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना घोषीत केल्यामुळे त्यांना विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या विषयी चिंता दिसली याचे स्वागत किशोर तिवारी यांनी केले. मात्र कृषी समस्यांचे मूळ कारणांचा शोध घेऊन मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...