आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:विदर्भवादी आंदोलकांचे चंद्रपूर येथे खा. बाळू धानोरकर यांनी केले स्वागत

नागपूर, चंद्रपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन निवासस्थानासमोर आलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे खासदार बाळू धानोरकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. स्वतंत्र विदर्भ राज्य हे वैदर्भीयांचा हक्क आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आपला पाठिंबा आहे. त्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, विधिमंडळाचे माजी उपसभापती मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या नेतृत्वात विदर्भवादी आंदोलकांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी खासदार धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी भाजप विरोधात आंदोलन करण्याची आज गरज आहे. विदर्भ राज्य मिळवून घेण्यासाठी लढा पुन्हा अधिक तीव्र करण्यासाठी आपला पाठिंबा कायम असेल. विदर्भातील एक खासदार म्हणून आपण नेहमी विदर्भ राज्याच्या बाजूने असू, असेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीता अमृतकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोहेल रजा, दिनेश चोखारे, प्रवीण पडवेकर, राज यादव, पप्पू सिद्धिकी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...