आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत "विदर्भ मिळवू औंदा' या घोषणेची अंबलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा या खनिजाचे उत्पादन थांबविण्याकरता महाराष्ट्र दिनाचा निषेध करून उमरेड कोळसा खाणी समोर महामार्गांवर अडीच तास कोळसा रोको आंदोलन केले.
अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात अडीच तास कोळसाखाणीमधून बाहेर जाणाऱ्या कोळशाचे ट्रक अडवून आंदोलन करण्यात आले. "शुरू हुई हैं जंग हमारी' "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ', या घोषणांनी व महाराष्ट्र दिनाचा निषेधाच्या घोषणानी परिसर दणाणून सोडला.
विराआसने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने "करू किंवा मरू' आंदोलन सुरू केले आहे. येणाऱ्या दिवसांत या आंदोलनाची तीव्रता वाढवून आंदोलनाचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
हे आंदोलन यशस्वी करण्या करीता, विराआस नेते अॅड. वामनराव चटप, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मत्ते, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, डॉ. दिलीप झलके, नरेश निमजे, रेखा निमजे, सुनीता येरणे, डॉ. रमेश कुमार गजबे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, कृष्णराव भोंगळे, दिलीप भोयर, राजेंद्र आगरकर, कपिल ईद्दे, मितीन भागवत, अरुण मुणघाटे, राजेंद्र सिंग ठाकूर, वसंत गवळी, सुदाम राठोड, घिसू खुणे पाटील, अतुल सतदेवे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनात महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. शेवटी स्वतंत्र विदर्भाची शपथ घेऊन पोलीस व आंदोलकांच्या रेटारेटी नंतर आंदोलन संपले. नागपुरात काही विदर्भवाद्यांनी विदर्भ चंडीकेची आरती केली. विदर्भवाद्यांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.