आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भावाद्यांची आर-पारची लढाई सुरु:शुक्रवारी खासदारांच्या कार्यालयात जाऊन मागणार राजीनामे

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भासाठी आर-पारची लढाई सुरू करण्याचा निर्णय विदर्भावाद्यांनी घेतला आहे. रविवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक गिरीपेठ येथील मुख्यालयात जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुधा पावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाकरीता आर-पारची लढाई सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या शुक्रवार, 11 रोजी विदर्भातील सर्व दहाही खासदारांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा राजीनामा मागणे तसेच तत्पूर्वी या सर्व खासदारांना पत्राद्वारे तसेच ईमेलद्वारे उत्तर मागण्याचे ठरवण्यात आले.

ठोस भूमिका सांगा?

घटनेतील कलम 3 प्रमाणे विदर्भ राज्य निर्मितीची जवाबदारी केंद्र सरकार व संसदेचीच असल्यामुळे केंद्र सरकार बरोबरच विदर्भातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या 10 खासदारांनी विदर्भ राज्य निर्मिती बाबत त्यांची व त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे? हे जाहीरपणे स्पष्ट करण्यास भाग पाडण्याकरीता खासदारांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघातील विदर्भवादी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या पुराव्यासह पोष्टाद्वारे व इ-मेलद्वारे 10 नोव्हेंबर पर्यंत पत्रव्यवहार करण्याचे आंदोलन करणार आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यातील 10 खासदारांना जाहीरपणे ते त्यांच्या खासदारकीच्या कालावधीत सत्ताधारी पक्षाचे (भाजपाचे) खासदार असूनही व त्यांच्या पक्षाने व त्यांच्या नेत्याने विदर्भातील जनतेला 2014 साली सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे जाहीर अभिवचन दिले होते. जनतेच्या आशा आकांक्षा धुळीस मिळवल्या म्हणून त्यांनी खासदार म्हणून खुर्चीत राहण्याचा अधिकार गमावल्यामुळे 11 रोजी त्यांच्या कार्यालयात जाऊन जाहीरपणे राजीनामा मागणार आहे. तसेच विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदीय आयुध्ये उपलब्ध असतानाही मागणी संसदेत जोरकसपणे मांडली नाही.

भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत व राज्य निर्मितीचा अधिकार केंद्र सरकार व संसदेचाच असल्यामुळे केंद्र सरकारला भाग पाडावे याकरिता विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळावर “हल्ला बोल आंदोलन” करण्यात येणार असून आर-पारच्या लढाईचा बिगुल वाजवणार आहे.

याबैठकीला युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी विष्णु आष्टीकर, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, अशोक पाटील, नागपूर विभाग महिला आघाडी अध्यक्षा रेखा निमजे, गुलाबराव धांडे, अरविंद भोसले, नागपूर दुर्बल घटक आघाडी अध्यक्ष ज्योती खांडेकर, पूर्व नागपूर अध्यक्ष संजय मुळे संध्या चौरासिया, संतोष खोडे, पुरुषोत्तम परतेकी, वसंतराव वैद्य, श्रीकांत दौलतकार, दिनेश मुळे, ललित पवार, सुशीलकुमार चौरासिया, आनद निखार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...