आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भावादी अ‍ॅक्शन माेडवर:खासदारांना दिला इशारा- 'तुझ्या भुजेत नाही बळ आता विदर्भ सोडून पळ'!

नागपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतला आहे. विदर्भावादी अ‍ॅक्शन माेडवर आले असून 'करा वा मरा'ची हाक दिली आहे. एनडीएचे घटक नसलेल्या खासदारांना महाराष्ट्रवादी समजून 'महाराष्ट्रावाद्यांनो विदर्भ सोडा' तसेच तुझ्या भुजेत नाही बळ आता विदर्भ सोडून पळ, असे बजावण्यात येईल.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता 28 सप्टेंबर रोजी नागपूर कराराचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती समिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयी झालेल्या बैठकीत विदर्भ राज्याच्या मागणी करीता 'जा गे मारबत करत' करीत 28 रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात व तालुका मुख्यालयी कालबाह्य झालेल्या व विदर्भातील जनतेची फसवणूक करणाऱ्या नागपूर काराराची होळी केली जाणार आहे.

117 वर्षे स्वतंत्र विदर्भाची मागणी

तसेच 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी जिल्ह्या-जिल्ह्यात व तालुक्या-तालुक्यात कार्यकर्ते गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार असून 3 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन पाठवून तत्काळ विदर्भाची निर्मिती करावी व 117 वर्षे सुरू असलेली स्वतंत्र विदर्भाची मागणी कायमची निकाली काढावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

देता की जाता विचारणार प्रश्न

समितीतर्फे जाहीर आंदोलनाची काटेकोर अंबलबजावणी करण्याची व कोणत्याही परिस्थितीत मिशन 2023 अंतर्गत आंदोलन तीव्र करून 2023 संपेपर्यंत लढ्याची धार तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बैठकीत बोलताना विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी 'शेंडी तुटो की पारंबी विदर्भ राज्य घेणारच', असा निश्चय केला.

या बैठकीत प्रकाश पोहरे यांच्यासह रंजनाताई मामर्डे, मुकेश मासुरकर, अरुण केदार, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, धनंजय धार्मिक, विष्णुपंत आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तुन्वार, सुयोग निलदावार, डॉ. रमेश गजबे, अविनाश काकडे, गुलाबराव धांडे आदी उपस्थित होते.

या शिवाय सर्व खासदारांना पत्र लिहून त्यांची विदर्भाबद्दलची भूमिका काय? हे जाहीरपणे जाहीर करावे अशी मागणी आहे. 11 नोव्हेबर रोजी सर्व खासदारांना एकाच दिवशी विदर्भाचे स्वतंत्र राज्य देता की खुर्चीतून जाता अशी विचारणा केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...