आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO चंद्रपूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली:थरारक घटना कॅमेऱ्यात कैद; ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला वाचवण्यात यश

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूरमधील घुटकाळा परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक तीन मजली इमारत कोसळली. इमारत कोसळली तेव्हा एक महिला इमारतीमध्येच होती. त्यामुळे ही महिला ढिगाऱ्याखाली दबली होती. नंतर तिला बाहेर काढण्यात यश आले.

इमारत कोसळताच प्रशासनाने बचाव मोहीम राबवत महिलेला बाहेर काढले.
इमारत कोसळताच प्रशासनाने बचाव मोहीम राबवत महिलेला बाहेर काढले.

इमारत अतिशय जीर्ण

शुक्रवारी दुपारी दीड वाजता अजानक ही इमारत कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घाटकाळा परिसरात बांधलेली ही इमारत खूप जुनी होती. त्यामुळे ही इमारत जीर्ण झाली होती. या कारणामुळे इमारतीत राहणारे इतर भाडेकरू इमारत रिकामे करून निघून गेले होते.

केवळ एका कुटुंबाचे वास्तव्य

मात्र, या जीर्ण इमारतीत एक कुटुंब राहत होते. या कुटुंबातील एक महिला वगळता इतर सदस्य घटनेच्या दिवशी बाहेर होते. त्यामुळे इमारत कोसळल्यामुळे ही महिलाही ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. मात्र, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बचाव मोहीम राबवत महिलेला बाहेर काढले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे.

ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढताना अग्निशमन दलाचे पथक.
ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढताना अग्निशमन दलाचे पथक.
बातम्या आणखी आहेत...