आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजीनाम्याच्या वृत्तावर काँग्रेस:'महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील, पण...', राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर वडेट्टीवारांचे भाष्य

नागपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोड यांचा राजीनामा मीडिया ट्रायलचा परिणाम, विजय वडेट्टीवारांची टिका

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मीडिया ट्रायलचा परिणाम असल्याची टिका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सतत एका मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

या राजीनाम्याच्या वृत्तावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'आतापर्यत शिवसेनेच्या एकाही नेत्याने राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, यात तथ्य असेल तर हा मीडिया ट्रायलचा परिणाम आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील. पण, त्यांना नैतिकता लागू होत नाही. तिथे नैतिकता संपुष्टात येते, असे वडेट्टीवार म्हणाले.'

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये सतत एका मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मंगळवारी मातोश्रीवर पाठवला असून तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला आहे. हा राजीनामा त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दिला की इतर काही कारणासाठी हे अद्याप स्पष्ट नाही. यासोबतच, राठोड यांच्या एका जवळच्या व्यक्तीने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. सोबतच, ही एक अफवा असल्याचाही दावा केला.

बातम्या आणखी आहेत...