आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडेट्टीवारांचा आणखी एक गोंधळ:गडचिरोलीत दारूबंदी मागे घेणार; वडेट्टीवार यांचा घोळ निस्तरा, डॉ. अभय बंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गडचिरोली जिल्ह्यात 1993 साली दारूबंदी लागू करण्यात आली आहे.

लॉकडाऊन उठवण्याविषयी अधिकारबाह्य घोषणा करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चार दिवस अगोदर अाणखी एक गोंधळ निर्माण केला आहे. चंद्रपूरपाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी उठवण्यासाठी समिती नेमण्याची जाहीर सूचना २९ मे रोजी गडचिरोलीत केली.

त्यामुळे दारूबंदी, आदिवासी व स्त्रियांचे हित आणि राज्य सरकारची भूमिका याविषयी जिल्ह्यातील जनतेच्या मनात संशय व गोंधळ निर्माण केला आहे. हा गोंधळ व मुंबई सरकारच्या हेतूविषयी लोकांच्या मनातला संशय दूर करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त करावे, असे आवाहन महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केले आहे.

मंत्री वडेट्टीवारांचा हा गोंधळ अजाणता घडलेला नाही. त्यांना चंद्रपूरला वार्षिक एक हजार कोटी रुपयांचा व गडचिरोलीत पाचशे कोटी रुपयांचा दारू व्यापार उभारायचा आहे. त्यासाठी हे केलेले सूतोवाच आहे. मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवारांचा हा गोंधळ निस्तरावा, असे आवाहन महाराष्ट्र भूषण डाॅ. बंग यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

१९९३ पासून दारूबंदी
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ साली शरद पवार मुख्यमंत्री असतांना दारूबंदी लागू करण्यात आली आहे. िवशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या ‘दारू-तंबाखू नियंत्रण राज्यस्तरीय टास्क फोर्स’ अंतर्गत नियंत्रणाचा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी ‘मुक्तिपथ’ ही संघटना निर्माण करून ११०० गावांनी दारूमुक्ती संघटना स्थापन केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...