आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दारूबंदी:चंद्रपूर जिल्ह्यात लागू दारूबंदी उठवली जाणार, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यावरही अवैध दारू सुरूच आहे
Advertisement
Advertisement

चंद्रपूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक दारूबंदीच्या निर्णयाचा आतापर्यंत तसा कुठलाच फायदा झाला नसल्याचे दिसून आले आहे. उलट यामुळे या संपूर्ण जिल्ह्यातच अवैध दारूचा सुळसुळाट झाला. त्यातून पोलिसांवर हल्ले वाढले. त्यामुळेच आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली. लवकरच काहीतरी निर्णय होईल, असे सांगत राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी उठवण्याचे संकेत दिले आहेत.

आम्हाला मतांचे राजकारण करावयाचे नाही. मात्र, दारूबंदी लागू झाल्यावर त्याचा काय फायदा झाला, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली होती. जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यावर अवैध दारू सुरूच आहे. त्यावर अंकुश लावता आलेला नाही. दारूच्या तस्करीतून पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. लवकरच काहीतरी ठोस निर्णय होईल, असे सांगत वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे दारूबंदी उठवली जाण्याचे स्पष्ट संकेत दिले.

Advertisement
0