आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गडचिरोली:नक्षल सप्ताहाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध; बॅनर जाळून केला निषेध

गडचिरोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली पोलिसांनी सुरू केलेल्या नक्षल जनजागृती अभियानाला चांगले यश मिळत आहे. अलिकडे जहाल नक्षलवादी शरण येण्याचे प्रमाण वाढल्याने नक्षल चळवळीला चांगलाच हादरा बसला असून जनजागृतीमुळे जिल्ह्यांत नक्षल्यांना तीव्र विरोध होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मंगळवार, २८ पासून सुरू झालेल्या नक्षल सप्ताहातही नक्षल्यांना ठिकठिकाणी विरोधाचा सामना करावा लागत आहे.

धानोरा उपविभातंर्गत येणाऱ्या सावरगाव पोलिस मदतकेंद्रातंर्गत असलेल्या सावरगाव ते मुरूमगाव रोडवरील त्रिशूल पाॅइंट तसेच सावरगाव ते गॅरापत्ती मार्गावरील कनगडीजवळ सोमवारी रात्री नक्षल्यांनी गावकऱ्यांनी नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. सावरगाव पंचक्रोशीत नागरिकांनी "नक्षलवाद मुर्दाबाद', "नक्षलवादी भगाव आदीवासी बचाव' असे नारे देत या बॅनरची होळी केली.

नक्षल कमांडर होयामी ठार

३ जुलै रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या येलदडमी जंगल परिसरात झालेल्या पोलिस व नक्षल्यांत झालेल्या चकमकीत गट्टा दलमचा डेप्युटी कमांडर अमोल होयामी हाही ठार झाल्याची माहिती नक्षल पत्रकातून मिळाली आहे. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षिस होते. २०१७ मध्ये तो भामरागड दलममध्ये सामील झाला होता. पेरमिली दलम कमांडर सोमा उर्फ शंकरसह अमोल होयामीला ठार करणाऱ्या सी-६० पथकाचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काैतुक केले आहे.