आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबावनकुळे हे राष्ट्रीय नेते आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट का नाकारण्यात आले असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधी चिंतन करावे? त्यांनी यावर विचार केला असता तर थोडस बरे होईल, असा सल्ला खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी खासदार विनायक राऊत नागपुरात होते. बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांच्या वक्तव्यावर एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर राऊतांनी हे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपमध्ये शब्दयुद्ध सुरूच आहे. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाला इशारा दिला होता. आमच्या नेता वर पुन्हा असे बोलले तर आम्ही तुम्हाला घरातून बाहेर पडू देणार नाही, असे ते म्हणाले होते. भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या या वक्तव्यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले, नागपुरात तिन्ही पक्षांची जोरदार सभेची तयारी सुरू आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही नागपूरचे आहेत. त्यामुळे अपेक्षित गर्दी पाहता दोघांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या भीतीपोटी भाजप महाविकास आघाडीची सभा रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या अडचणी निर्माण करत आहे.
मविआच्या सभा होऊ नये यासाठी प्रयत्न
ठाकरे गटाचे नेते म्हणाले, पहिल्या दिवसापासून भाजप महाविकास आघाडीला राज्यात सभा घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पहिल्या सभेपूर्वी तेथील हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दंगलीच्या सूत्रधाराला अटक करण्याची मागणी आम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. पण या घटनेची अजून देखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आमची बैठक थांबवण्याचा हे सरकार पुरस्कृत प्रयत्न करीत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.