आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराणेशाहीला फुलस्टॉप:भाजपने घराणेशाहीमुळे येणाऱ्या हुकुमशाहीला पूर्णविराम दिला- राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची टीका

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाही राजकारणाला एक फुल स्टॉप दिला आहे. घराणेशाहीमुळे येणाऱ्या हुकुमशाहीला पूर्णविराम देण्यात भाजपाला यश आल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. भाजपाच्या स्थापनादिनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी आले असता ते बोलत होते.

काय म्हणाले तावडे?

तावडे म्हणाले, यापूर्वी राजकारणामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधाऱ्यांवर व्हायचे. गेल्या नऊ वर्षांमध्ये असा कुठलाही आरोप केंद्रातील राजकारणात कुणावरही झालेला नाही. भ्रष्टाचार विरहित सत्ता देता येते हे भाजपाने सिद्ध केले. तरीही, विरोधकांचा सातत्याने भाजपला विरोध करणे चालू असताे. हा विरोध घराणेशाही पक्षाच्या आधारे सुरू असतो असे तावडे यांनी सांगितले.

भाजपा हा सत्तेसाठी नाही तर सत्ता ही समाज परिवर्तनाचे साधन आहे हे मानून काम करणारा पक्ष याची खूणगाठ प्रत्येक कार्यकर्त्याने मनाशी बांधली आहे. सत्ता हे साधन आहे साध्य नाही. परिवर्तनाचे काम गतीने होण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण झोकून देऊन काम करेल, असेही ते म्हणाले.

फडणवीसांवर केलेली टीका दुर्दैवी

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका ही अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारी नसल्याचे तावडे म्हणाले. राजकारणाची एक वेगळी परंपरा आहे. मला आठवते की मी विरोधी पक्ष नेता असताना सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका केली होती. पण त्या नंतर आम्ही एका केबिनमध्ये जेवलो होतो. महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे की एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय उपस्थित राहातात. भारतात इतर ठिकाणी अशी परंपरा पाहायला मिळत नाही.