आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळकरी मुलांसोबत तयार करणार 5 हजार किलोंची भाजी:ख्रिसमसला शेफ विष्णू मनोहर करणार सलग 15 वा विश्वविक्रम

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळकरी मुलांसाेबत विष्णू मनोहर तयार करणार ५ हजार किलोंची भाजी, ख्रिसमसला करणार सलग १५ वा विश्व िवक्रम

चमचमीत पदार्थांसोबतच नवनवीन रेकाॅर्ड स्थापन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणखी एक नवा रेकाॅर्ड स्थापन करण्यासाठी तयार झाले आहेत. येत्या रविवारी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसला ते स्थानिक बी. आर. ए. मुंडले हायस्कूलच्या सुमारे १२०० मुलांसोबत ५ हजार किलोंची भाजी तयार करणार आहेत.

भाजी निवडणे, चिरणे आणि स्वच्छ करणे ही कामे मुले करणार आहेत. तर, भल्या मोठ्या कढईत फोडणी देण्याचे काम विष्णू मनोहर करणार आहेत. भाजीचा मनोहर यांचा हा १५ वा विश्व विक्रम असणार आहे.

भाजीचे वजन 4997.16 किलो

चिरलेली भाजी पाण्यात ठेवली तर खराब होत नाही. म्हणून शनिवारी २४ डिसेंबर रोजी मुले भाजी चिरून, कापून ठेवणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजेपासून प्रत्यक्ष भाजी तयार करण्यास सुरूवात होईल. या भाजीसाठी कांदे ३३० किलो, लसुण, आलं व बटाटे प्रत्येकी ६६.१ किलो, गाजर ३३० किलो, फुलकोबी ६६१ किलो, पनीर ३३०.५ किलो, टोमॅटो ६६१ किलो, मटार ३३०.५ किलो, सांभार १३२.२ किलो, तिखट ५२.८८ किलो, हळद ३३.०५ किलो, धने पावडर ३९.६६ किलो, मीठ ३३.०५ किलो, साखर १३.२२ किलाे, तेल ३९६.६ किलो असे एकूण ४१३७.८६ जिन्नस लागणार आहे. तयार भाजीचे वजन ४९९७.१६ किलो इतके राहिल.

6 हजार किलोचा चिवडा

यापूर्वी विष्णू मनोहर यांनी रविवार १६ ऑक्टोबर रोजी म्हणजेच जागतिक खाद्यान्न दिनी दोन हजार किलो महाचिवडा तयार केला होता. रामदासपेठ येथील विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी ९ ते ११ या वेळेत तयार करण्यात आलेल्या चिवड्याचे कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले होते.

2500 किलोचा प्रसाद

गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी नागपुरातच २५०० किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले होते. सलग ५३ तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा "सर्वात लांब पराठा' तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 3 तासांत ७००० किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी भारतात ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी ३००० किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर ५००० किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

बातम्या आणखी आहेत...