आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्व हिंदू परिषदेने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक म्हणजेच सदस्यता मोहीम हाती घेतली होती. संपूर्ण भारतात दीड लाख गावात संपर्क साधून एक कोटी हिंतचिंतक जोडण्यात येणार होते. आतापर्यत एक लाख गावात संपर्क साधून सुमारे ६२ लाख हितचिंतक जोडल्याची माहिती विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली.
३० व ३१ डिसेंबर २०२२ व १ जानेवारी २०२३ असे तीन दिवस मध्य प्रदेशातील इंदौर येथे आयोजित बैठकीत संपूर्ण देशभरातील आढावा घेण्यात येईल, असे परांडे यांनी सांगितले. या ६२ लाख हितचिंतकामध्ये सुमारे १२ लाख महिला व ३० लाखांपेक्षा जास्त युवक असल्याचे परांडे यांनी सांगितले. यापूर्वी २०२१ मध्ये ३० लाख हितचिंतक झाले होते.
गावोगावी जागृती
मिलिंद परांडे यांनी सांगितले की, ६ नोव्हेंबरपासून प्रारंभ झालेल्या हितचिंतक अभियानात गावोगावी धर्मांतरण, लव्ह जिहाद, गोवंश रक्षण आदींविषयी जागृती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भातील गावांमध्ये विहिंप, बजरंग दल, दुर्गा वाहिनी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन २० रूपये नोंदणी शुल्क घेऊन हितचिंतक नोंदणी केली.
या हितचिंतक अभियान निमित्त विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे यांनी देशभर प्रवास केला असून हितचिंतक अभियान निमित्त बैठका, कार्यकर्त्यांचा मेळावे आयोजित करण्यात आले होते.
प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांशी संपर्क
तीन वर्षांतून एकदा चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत विहिंपने यावेळी देशातील दीड लाख गावांपर्यंत पोहोचण्याची योजना आखली होती. १५ वर्षांवरील प्रत्येकाला हितचिंतक करण्यात आले. या अभियानांतर्गत प्रत्येक जाती, धर्म, पंथाच्या लोकांशी संपर्क साधला जाणार आहे. हे लोक हिंदू समाज आणि राष्ट्रहिताच्या कार्याशी जोडले जातील.
मोहीमेचा उद्देश
विहिंप या मोहिमेद्वारे लोकांना धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. सेवा कार्यापासून वंचित समाजाला जोडणे, सनातनचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, गायींचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, सामाजिक एकोपा निर्माण करणे आणि हिंदू समाजाच्या रक्षणासाठी निर्धाराची भावना निर्माण करणे हे मोहीमेचे उद्देश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.