आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Vishwa Hindu Parishad Philanthropic Campaign From Today Will Reach One Crore Members By Contacting One And A Half Lakh Villages Across The Country

आजपासून विश्व हिंदू परिषदेची हितचिंतक मोहीम:देशभरात दीड लाख गावात संपर्क साधणार, एक कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य

प्रतिनिधी/नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विश्व हिंदू परिषद उद्या रविवार 6 नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक म्हणजेच सदस्यता मोहीम सुरू करणार आहे. 20 नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम सुरू राहाणार आहे, अशी माहिती विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली.

6 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या हितचिंतक अभियानात गावोगावी धर्मांतरण, लव्ह जिहाद, गोवंश रक्षण आदींविषयी जागृती केली जाणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भातील गावांमध्ये विहिंप, बजरंग दल, दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन 20 रु. नोंदणी शुल्क घेऊन हितचिंतक नोंदणी करणार आहे. 1 कोटीहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या अभियानात प्रांतातील साधू- संत, गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी, मठ मंदिरांचे विश्वस्त, विविध जाती-संप्रदायचे प्रमुख यांना हितचिंतक ( सदस्य) करण्यात येणार असून दुर्गा वाहिनी आणि मातृशक्तीद्वारे 50 हजार महिलांना सदस्य करण्याचे ठरवण्यात आले आहे. या हितचिंतक अभियान निमित्त विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे, क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे यांचा प्रवास झाला असून हितचिंतक अभियान निमित्त बैठकी, कार्यकर्त्यांचा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

विदर्भात संपूर्ण 32 जिल्ह्यात 3 लाख हितचिंतक नोंदणी करणार आहे. विदर्भातील 12,500 गावात विश्व हिंदू परिषदेचे सदस्य करण्याचे लक्ष असून गोंदिया, खामगाव, यवतमाळ येथील गावांमध्ये शत प्रतिशत हितचिंतक करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या हितचिंतक अभियानात सहभागी होऊन विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक होण्याचे आवाहन प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केले आहे.

अभियान विश्व हिंदू परिषदेने संघटनेच्या विस्ताराअंतर्गत यावेळी एक कोटीहून अधिक सदस्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशभरात 6 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत एकाच वेळी मोहीम राबविण्यात येणार आहे. तीन वर्षांतून एकदा चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत विहिंपने यावेळी देशातील दीड लाख गावांपर्यंत पोहोचण्याची योजना आखली आहे. १५ वर्षांवरील कोणीही हितचिंतक होऊ शकतो. या अभियानांतर्गत प्रत्येक जाती, धर्म, पंथाच्या लोकांशी संपर्क साधला जाणार आहे. हे लोक हिंदू समाज आणि राष्ट्रहिताच्या कार्याशी जोडले जातील. विहिंप या मोहिमेद्वारे लोकांना धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...