आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबत महाराष्ट्रात सातत्याने वाद सुरू आहे. आता या वादात विश्व हिंदू परिषदेनेही उडी घेतली आहे. धर्माच्या विरोधात जाईल त्याचा अंत होईल, असा रोखठोक इशारा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिला. नागपुरातील रेशिमबाग येथे बजरंगदल शिक्षकांचा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. त्या दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.
..तर तो संपुष्टात येईल
मिलिंद परांडे म्हणाले, धर्माच्या विरोधात जाईल तो संपुष्टात येईल. जिथे जिथे हिंदू धर्म वाढताना दिसतो, तिथे दुर्दैवाने हिंदूविरोधी शक्ती कार्यरत आहे. त्यांना हिंदू धर्माचा उत्कर्ष पाहावत नाही. अशावेळी असत्याचा आधार घेत हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. संत, मंदिरे तसेच यात्रांना बदनाम करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहे. हे चूक असून असे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. हिंदू राष्ट्र आहेच. ते घोषित करण्याची गरज नाही.
हिंदूराष्ट्र आधीही ते आताही
मिलिंद परांडे म्हणाले, हिंदूराष्ट्र आधीही होते, आताही आहेच आणि भविष्यातही राहिल. त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. आमचे कार्य हिंदू राष्ट्राला प्रबळ आणि परिणामकारक करणे आणि अधिक संघटित करणे हे आहे. राष्ट्र ही भौगोलिक आणि राजकीय संकल्पना नाही. ही एक सांस्कृतिक संकल्पना असल्याने राजकारणाशी याचा काही संबंध नाही. एक राष्ट्र आणि अनेक राज्ये हे आपल्याकडे पूर्वीही होतेच. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व राज्यांचे विलिनीकरण करून त्यांना एकत्र आणले. राष्ट्र एक होते म्हणून इतकी राज्ये सहजपणे एकत्र आली. ही एक अनुस्यूत विचारधारा असल्याचे परांडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.