आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16; पुणे, मुंबई येथून आलेले तीन रुग्ण पॉझिटिव्ह

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मुंबई, पुणे व इतर राज्यांमधून नागरिक जिल्ह्यात दाखल होत आहेत. हिंगणघाट तालुक्यातील पती पत्नी व सावंगी मेघे येथील तरुणी या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एकूण 16 रुग्णांची भर झाली असल्याने, खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

हिंगणघाट तालुक्यातील शिरुड येथील रहिवासी असलेले पती वय 37 वर्ष व पत्नी वय 32 वर्ष हे दोघेही दिनांक 15 मे रोजी पुणे या शहरामधून आले होते. त्या दोघांना गावातील शाळेच्या आवारात विलगिकरणात ठेवण्यात आले होते.त्याच बरोबर सावंगी मेघे येथील 28 वर्षीय तरुणी मुंबई येथून दिनांक 16 मे रोजी दाखल झाली होती. तिला गृह विलगिकरणात ठेवण्यात आले होते. तीनही रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून येताच त्या तिघांचा स्त्राव तपासणी करिता पाठविण्यात आला असता, दिनांक 26 मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पती व पत्नीस सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात व युवतीवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.शहरातील सुदामपुरी वार्ड येथील 63 वर्षीय रुग्णांचा अहवाल आंध्रप्रदेश राज्यातील सिकंदराबाद येथील असलेल्या गांधी सामान्य रुग्णालयात पॉझिटिव्ह आला असल्याने, 100 घरांचा परिसर सील करण्यात आला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या 16 वर पोहचली असल्याने खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यामध्ये एक मृतक महिलेचा समावेश करण्यात येत असून, सर्वांवर सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...