आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा कोरोना अपडेट:वर्ध्यात आज दोन रुग्णांची नोंद; एक महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी आलेली महिला कोरोना बाधित

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकोल्यातील एक महिला तर कोरोनाबधित महिलेच्या पतीची बहीण कोरोना पॉझिटिव्ह

लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असल्याने, सर्वांना गावी येण्या-जाण्याची ओढ लागली आहे. यातच जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून गुरुवारी रोजी आर्वी येथील 24 वर्षीय महिलेसह सावंगी मेघे येथील कोरोना बाधित महिलेच्या पतीची 19 वर्षीय बहीण पॉझिटिव्ह आढळली. यासोबत जिल्ह्यात 19 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकजण गावी येत आहेत. लोक कशाची पर्वा न करतात जिल्ह्यात दाखल होत असून विलगिकरणात ठेवण्याच्या संख्येत वाढ होत आहेत. अकोला येथील रहिवासी असलेली 24 वर्षीय महिला माहेरी आर्वी शहरात 24 मे रोजी एक महिन्याच्या बाळाला घेऊन दाखल झाली होती. तिला गृह विलगिकरण करीत तिचा स्त्राव तपासणी करिता पाठवविण्यात आला होता. सोबतच सावंगी मेघे येथील वार्ड क्रमांक 1 मधील रहिवासी परिचारिका 28 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याने, त्या महिलेच्या पतीची 19 वर्षीय बहीणीचा अहवाल दिनांक गुरुवारी पॉझिटिव्ह आला तर अकोला येथील रहिवासी असलेली आणि आर्वी येथे माहेरी आलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने जिल्ह्यात 19 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

19 वर्षीय तरुणीवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर आर्वी येथील महिलेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...