आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूधदरवाढ आंदोलन:म्हशीला सोबत घेऊन मनसेचे आंदोलन, दुधाला 10 रुपये तर पावडरला 50 रुपये अनुदान देण्याची मागणी

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. पिकाला भाव मिळत नसून, दुधाची दरवाढ होत आहे. दूध उत्पादकांना शासनाच्या वतीने अनुदान मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हशीला आंदोलनात सहभागी करीत अनोखे आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध नोंदवला.

शासनाच्या नियमानुसार गाईच्या दुधाला 27 रु 50 पैसे तर म्हशीच्या दुधाला 34 रुपये दर मिळणे आवश्यक असतानाही खासगी सहकारी व शासकीय दूध संघांनी दूध दरात 10 ते 15 रुपयांची कपात करण्यात सुरुवात केली आहे. त्यातच पशु खाद्याचा दरात मोठी वाढ झाल्याने व दुधाचे पेमेंट महिना-महिना मिळत नसल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

यावर्षी कोरोनामुळे लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्सव, हॉटेल्स, मॉल्स, स्वीट मार्टस बंद असल्याने मागणी घटल्याचे कारण देऊन संघांनी भावात कपात केली. तसेच चीन युरोप व आफ्रिका या देशात आपल्याकडून होणारी दूध पावडर निर्यात बंद झाली आहे. यामुळे सध्या देशात 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक आहे. तर राज्यात 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. यासर्व बाबींमुळे दूध पावडरचा भाव 330 रुपयांवरून 180 रुपयांवर आला आहे. याचा परिणाम दूध दरावर होणे सहाजिक आहे.

तसेच शासनाने कोरोनामुळे जारी केलेल्या लॉकडाउन कालावधीत दुधाची मागणी कमी झाल्याने दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये, खरे पाहता पिशवी बंद दूध व दुधाचे उपपदार्थ विक्री करणाऱ्या दूध संघांनी दुधाचे दर कमी करणे चुकीचे आहे. कारण पिशवी बंद दूध व उपपदार्थांचे विक्री दर कायम च आहे आजही गायीच्या पिशवी बंद दुधाची विक्री 40 ते 45 रुपये लिटरने होत आहे, तर म्हशीच्या पिशवी बंद दुधाची विक्री 50 ते 58 रुपये लिटरने होत आहे. याचा अर्थ दूध उत्पादकाला मिळणाऱ्या भावापेक्षा शहरातील पिशवी बंद दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुप्पट हून अधिक दर मोजावा लागत आहे.

उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत दूध पोहोचेपर्यंत दूध दरात लिटर मागे 20 ते 30 रुपयांची वाढ होत आहे. ही एवढी वाढ कशी काय होत आहे. या प्रश्नाचे उत्तर सरकारने शेतकऱ्यांना द्यावे आणि शेतकऱ्यांचा दुधाला प्रति लिटर 10 रु अनुदान देऊन त्यांना तात्काळ न्याय द्यावा या मागणी करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हशीला आंदोलनात सहभागी करीत अनोखे आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, मनसेचे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर वाढई, मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, सुनील भुते, शंकर देशमुख, गोमाजी मोरे, जयंत कातरकर, राजू भोबले, प्रवीण श्रीवास्तव, प्रशांत एकोणकर, राहुल सोरटे, उमेश नेवारे,विठ्ठल तळवेकर, खेमराज बालपांडे, गणपत येळणे, सुनील पिसे, नितीन राऊत, अमित क्षीरसागर, मिथुन नखाते,परम बावणे, वानखडे,अजय पर्बत, नितीन भुते, जगदीश वांदिले, गजू कलोडे, नरेश चिरकुटे, अमोल मुडे यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...