आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:कोरोना पॉझिटिव्ह मृत महिलेच्या संपर्कातील 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 5 जणांचे प्रलंबित

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महिलेच्या अंत्यसंस्काराला 13 गावातील लोकांनी हजेरी लावली होती

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील कोरोना बाधित मृतक महिलेच्या संपर्कातील 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 5 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मडावी यांनी दिली आहे. 

महिलेचा ८ मे रोजी मृत्यू झाल्याने तिच्या अंत्यसंस्काराला 13 गावातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. दोन दिवसांनी 10 मे रोजी मृतक महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आर्वी तालुक्यात दहशत निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनकडून मृतक महिलेच्या संपर्कातील 28 जणांना अलगिकरण कक्षा मध्ये ठेवण्यात आले होते. त्या 28 जणांचे स्त्राव तपासणी करिता पाठविले असता, 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर 5 रिपोर्ट प्रलंबित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मडावी यांनी सांगितले आहे. 13 गावे सील करण्यात आलू असून, मृतक महिलेच्या संपर्कातील असलेल्या 140 जणांना गृह विलगिकरणात करण्यात आले आहे.

हिवरा तांडा येथील 35 वर्षीय मृतक महिला ही गावठी दारुचा व्यवसाय करीत होती. नागपूर व अमरावती या ठिकाणी असलेल्या चेकपोस्टवरुन तिची सतत आवक-जावक सुरु होती असल्याचे बोलले जात आहे. नागपूर व अमरावती या दोन ठिकाणावरून तिने कोरोना आणला असावा अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...