आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:वाशीम शहरातील चोऱ्यांचा उलगडा; दोन‎ अटकेत, 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त‎

वाशीम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिव्हील लाईन‎ परिसरातील ‘रिगल‎ कॉम्पुटर’समोरून एका व्यक्तीला‎ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या‎ हातातील मोबाइल जबरदस्ती‎ हिसकावणाऱ्या दोघांविरुद्ध वाशीम‎ शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.‎ तसेच शहरातील ‘मनिप्रभा हॉटेल’‎ जवळील ‘राठी हॉस्पिटलस’‎ समोरून चोरट्यांनी एक‎ मोटारसायकल लंपास केली होती. या‎ प्रकरणात सुद्धा पोलिसांनी गुन्हा‎ दाखल केला होता. दोन्ही प्रकरणांचा‎ तपास सुरू असताना मालेगाव‎ शहरातील एका आरोपींचा सदर‎‎‎‎‎‎‎‎‎ गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे‎ निष्पन्न झाले.

त्या आधारे स्थानिक‎ गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव‎ शहरातील दोघांना ताब्यात घेतले.‎ त्यांच्याकडून हिसकावून नेलेला‎ मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली‎ मोटारसायकल व चोरीस गेलेली‎ मोटारसायकल असा एकूण १.२५‎ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎ आला.‎ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे‎ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव,‎ सपोनि. अतुल मोहनकर, पोहवा.‎ सुनील पवार, पोना. राजेश राठोड,‎ प्रशांत राजगुरू, पो. शि. नीलेश‎ इंगळे, दिगंबर मोरे, अविनाश वाढे,‎ विठ्ठल सुर्वे, गोपाल चौधरी, प्रशांत‎ चौधरी यांनी केली.‎