आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशिम:हार्डवेअर आणि मशनरीच्या दुकानाला भीषण आग, तीन तासानंतर आगीवर नियंत्रण

वनोजा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजारमध्ये एका हार्डवेअर आणि मशनरीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. मंगरुळपीर रोडवर असणाऱ्या या दुकानाला मध्यरात्री 12.15 च्या सुमारास आग लागली. दुकानात विविध प्रकारच्या मशनरी असल्याने, आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तीन तासानंतर आगीवर नियंत्रण
या आगीमध्ये दुकानातील लाखो रुपयांच्या मशनरी जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगावमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासांच्या आथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास आग अटोक्यात आली. या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र लाखो रुपयांच्या मशनरी जळून मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे. या आगीच्या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नुकसानाचा आढावा
दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी कोडगे, ठाणेदार धनंजय जगदाळे आणि पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. दुकानाला जेव्हा आग लागली होती, तेव्हा स्थानिक तरुणांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाबाहेर गेल्याने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. यावेळी पोलिसांकडून या तरुणांचे देखील कौतुक करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...