आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:आम्ही महाराष्ट्र प्रभारी पाटील यांच्या म्हणण्याला महत्त्व देतो, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा नाना पटोलेंना टोला

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे प्रदेेशाध्यक्ष नाना पटोले रोजच बोलतात. त्यांना मी रोज काय प्रत्युत्तर देऊ, असा सवाल करतानाच एच. के. पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देतो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना लगावला. नागपुरात आयोजित कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

पाटील यांच्या बोलण्यात तथ्य असते. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात, असा चिमटा पटेल यांनी काढला. एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिन्ही नेते शरद पवारांना भेटले. त्यानंतर या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याचा अर्थ काय? इशारा तुम्हाला माहीतच आहे, असे सूचक वक्तव्य पटेल यांनी केले.

काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे. यावर बोलताना ज्यांना जे करायचे आहे त्यांनी ते करावे. कुणीच कुणाला बांधून ठेवलेले नाही, असे ते म्हणाले. आघाडीत ज्या पक्षाला जे करायचे आहे त्यांनी ते करावे. त्यावर आम्ही रोज रोज उत्तरे का द्यावी, असा सवाल पटेल यांनी केला. बाकीचे काय बोलतात याला महत्त्व नाही. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. आघाडीला त्यांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्याच नेतृत्वात सरकार चालले आहे, असे सांगायलाही पटेल विसरले नाहीत. बाकीचे काय बोलतात याला महत्त्व नाही. नाना पटोले रोज बोलतात. त्यावर रोज प्रत्युत्तर देणे योग्य वाटत नाही. त्यांना सविस्तर उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. म्हणून त्यावर जास्त बोलणे योग्य नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी नाही असेही पटेल म्हणाले.

एका व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नाही
एका व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नाही. राजनीतिकार प्रशांत किशोर यांनी आधी शरद पवार आणि नंतर काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. प्रशांत किशोर कन्सल्टंट आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात, ते कुणालाही भेटू शकतात, असे पटेल म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळ आणि एनआयटी सदस्य नेमायचा फॉर्म्युला ठरला आहे. त्याप्रमाणे आमच्या जागा भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचा अजेंडा काय आहे त्यांनाच विचारा.

बातम्या आणखी आहेत...