आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चेकरांना उत्‍तर:लाेककलावंतांचे सर्व प्रश्न साेडवू : मुनगंटीवार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर मोर्चा घेऊन आलेल्या लोककलाकारांच्या बहुतांश मागण्यांशी सहमती दर्शवत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला. शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांचे सर्व प्रश्न सोडूवू असेही त्यांनी सांगितले.राज्यातील विशेषतः विदर्भातील लोककलाकारांच्या समस्यांसंदर्भात लक्ष वेधण्याकरता तसेच विविध मागण्या मांडण्याकरिता लोककला सेवा मंडळाने विधिमंडळावर मोर्चा काढला होता. त्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री मुनगंटीवार यांनी विस्तृत चर्चा केली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात या चर्चेदरम्यानच त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.

बातम्या आणखी आहेत...