आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकातकरी समाजातील वेठबिगारीसह पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने एक संयुक्त बैठक बोलावून सोडवू, अशी ग्वाही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी लक्षवेधीवरील चर्चेत दिली. नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, ठाणे, पालघर, रायगड आदी आदिवासी जिल्ह्यांत परिस्थिती गंभीर आहे. एका शेळी मेंढीच्या बदल्यात मुले विकली जात असल्याचे छगन भुजबळ यांनी लक्षात आणून दिले. या कातकरी समाजाचे पुनर्वसन, त्यांना आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, घरकुल, शिधापत्रिका आदी सुविधा देणार काय, असा सवाल भुजबळ यांनी केला.
यावर उत्तर देताना कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या प्रश्नावर संयुक्त बैठक बोलावून तातडीने सर्व समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले. नाशिक, ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ बालके अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील मेंढपाळांकडे वेठबिगार म्हणून आढळली. यापैकी १६ बालकांना दहागाव येथील आदिम जाती माध्यमिक आश्रमशाळेत दाखल केले आहे. तीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तर २१ बालकांना वेठबिगारीतून सोडवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील दोघांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे, असे खाडे यांनी सांगितले.
२१ पैकी १९ मुलांना तातडीची मदत कातकरी समाजाचे पुनर्वसन तसेच त्यांना पुनर्वसन, त्यांना आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, घरकुल, शिधापत्रिका आदी सुविधा देण्यासंदर्भात बैठक बोलावून तातडीने मदत करण्यात येईल, असे खाडे यांनी सांगितले. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात आढळून आलेल्या व वेठबिगारीतून सोडवण्यात आलेल्या २१ पैकी १९ मुलांना प्रत्येकी ३० हजारांची तातडीची मदत देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.