आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जोडो ही नेत्यांची यात्रा आहे. यात्रा म्हणण्यापेक्षा ही जत्रा आहे. यात्रेत जाणे तसेच जत्रेत जाणे हे राजकीय नेत्यांचे कामच आहे. त्याला मी काही फारसे महत्व देत नाही, असा टोला राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर विमानतळावर बोलताना हाणला.
भारत जोडो यात्रा म्हणजे एक प्रकारचा शो आहे. अशा रोड शोने भारत जोडल्या जात नाही. यात जनता सहभागी झालेली नसून नेते सहभागी झालेले आहे. जनतेमधून विश्वासार्हता संपलेले यात्रेत सहभागी होत आहेत. काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट आहे. स्वत:चे अस्तित्व गमावलेले राहुल गांधी स्वत:ची प्रतिमा उजळण्यासाठी भारत जोडो यात्रा काढीत आहे.
संजय राऊत यांची सुटका ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यावर काही भाष्य करणार नाही. पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल, असे ते म्हणाले.
सरकारमध्ये अंतर्विरोध असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करीत आहे. असे आरोप करून ते एक प्रकारे असुरी आनंद व्यक्त करीत आहे. स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न ते करीत आहे. पण वास्तव आहे ते मान्य केले पाहिजे. कोण तुरुंगात जाते, कोण बाहेर येते त्याला महत्व नाही. त्यांच्या नेत्यांचे आत-बाहेर सुरूच राहिल.
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे. दुसऱ्या टप्प्यातील बदल्या आता होईल. मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे बदल्या होऊ शकल्या नाही. काही लोकांचे विनंती अर्ज आहे, काही बदल्या प्रशासकीय कारणाने होईल. ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते लवकर बदल्या होईल.
महानंदची अवस्था बिकट आहे. अतिरिक्त नोकर भरतीमुळे वेतनाचा बोजा आला. दूधसंकलन 9 ते 10 लाख लिटरवरून 40 हजार लिटरपर्यत आलेले आहे. म्हणून एनडीडीबीने चालवायला घ्यावी असा प्रस्ताव दिला आहे. स्वतःच्या अस्तित्वाची धडपड सुरू असलेल्या नेत्यांची यात्रेत गर्दी आहे. त्याचा काही फायदा होणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.