आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अमिताभ बच्चन नितीन गडकरींचे कौतुक करतात:तुम्ही वयापेक्षा 10 ते 15 वर्षे तरुण दिसता,  केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी मुंबईला गेलो असताना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची भेट घेतली. तेव्हा दोघांनी वयापेक्षा दहा ते पंधरा वर्षे तरुण दिसता असे प्रमाणपत्र दिल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यावरून योग आणि प्राणायमाचे महत्त्व किती आहे हे तुमच्या लक्षात आले असेल, असेही गडकरी म्हणाले.

पुढे गडकरी म्हणाले, नियमित प्राणायाम आणि योगा केल्यामुळे माझ्या आरोग्यात भरपूर सुधारणा झाली आहे. काही वर्षांपूर्वी माझे आरोग्य चांगले नव्हते, नंतर मी नियमित प्राणायाम सुरू केले आणि आज त्याचे भरपूर लाभ मिळत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

भारत रक्षा मंचतर्फे रेशीमबाग येथे आयोजित तिसरे अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशनात गडकरी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर उपस्थित होते.

रोज 1 तास प्राणायम

मी दररोज एक तास प्राणायम करतो. त्याशिवाय माझी कामे मी करीत नाही. मला एका डॉक्टरांनी प्राणायम कसे करायचे ते शिकवले. हे तुम्ही युट्यूबवरही पोस्ट करा म्हणजे त्याचा इतरांनाही फायदा होईल, असे मी डाॅक्टरांना सांगितले. योगासने आणि प्राणायम यातला मी तज्ज्ञ नाही. मात्र प्राणायम आणि योगासन केल्याने आपण तंदुरूस्त राहतो हे लक्षात घेतले पाहिजे असेही गडकरी म्हणाले.

आयुर्वेदाबद्दल ज्ञान नाही

आपली हिंदू संस्कृती खूप महान आहे. मात्र केवळ महान म्हणून चालणार नाही. मुळात आपल्या संस्कृतीची महानता योग आणि आयुर्वेद सारख्या ज्ञानाशी जोडलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे जगात फिरतो, तिथे लोक आयुर्वेद आणि योगाबद्दल बोलतात आणि विचारतात. मात्र आयुर्वेदाबद्दल तेवढे ज्ञान माझ्याकडेही नाही असे गडकरी म्हणाले. आज अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत. फक्त आपण आपला ज्ञान चांगल्या तऱ्हेने प्रेझेंट करायला शिकलो पाहिजे असेही गडकरी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...