आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे गुजरातला जावो की बिहारला:मुंबई मनपा निवडणूक आम्हीच जिंकू - सुधीर मुनगंटीवार यांचा आशावाद

नागपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''आम्ही नक्षल भागात राहतो, तरीही आमची सुरक्षा काढली. सरकार सुरक्षा काढत नसून गृह विभागाची समिती त्या संदर्भात निर्णय घेते. आदित्य ठाकरे गुजरातमध्ये जावो की बिहारमध्ये जावो. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षच जिंकेल असा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात केला आहे.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी राज्य पुनर्रचना आयोगाच्या माध्यमातून केलेली चूक आजही त्रासदायक ठरत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न पंडित नेहरूंनी निर्माण केला, अशी टिकाहीृ मुनगंटीवार यांनी केली.

सीमा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. काही प्रश्न अनेक वर्ष सुटले नाही. अयोध्या, कलम 370 हे प्रकरण कोर्टात सुटले. त्याच पद्धतीने भविष्यात सीमावादचा प्रश्नही सुटेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

40 गावांच्या संदर्भात दोन्ही राज्ये सकारात्मक असतील तर या संदर्भात सर्वोच्च न्यायालय दोन्ही राज्यांचे, दोन्ही विभागातील जनतेचे मत ऐकून घेईल आणि सकारात्मक निर्णय घेईल. शेवटी प्रश्न सुप्रीम कोर्टातून सोडवावा लागेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात असणारा मराठी माणूस कर्नाटकात गेला तरी त्याला महाराष्ट्रात यावेसे वाटते. तसेच कर्नाटकातील मराठी माणसांना आजही आपण महाराष्ट्रात आलो पाहिजे असे तीव्रतेने वाटते. आणि पंडित नेहरूंच्या चुकीचे प्रायश्चित त्यांना घ्यावे लागेल.

जतमधील 40 ग्राम पंचायती तिकडे जाण्यासाठी ईच्छुक असेल तरी प्रश्न तसा सुटणार नाही. कारण कर्नाटक सीमेवरील शेकडो ग्राम पंचायतींना महाराष्ट्रात यायची ईच्छा आहे. त्यामुळे या प्रश्नाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला समितीच्या माध्यमातून करावा लागेल. या ग्राम पंचायतींना मदत करण्यात महाराष्ट्र सरकार अजिबात कमी पडले नाही. कारण महाराष्ट्र सरकार एवढी मदत देशातील कोणतेही सरकार करीत नाही. महाराष्ट्र मदत करण्यात कधीच कमी पडलेला नाही. म्हणून अशी कारण सांगून ठराव करणे आश्चर्याचे आहे.

आमची भूमिका सकारात्मक आहे, असे ते म्हणाले. प्रभाग रचनेत मागील सरकारने काही बदल केले त्यामुळे पुनर्रचना करून प्रभागाची आखणी केल्या जाईल. आगामी नगरपंचायत महानगरपालिका निवडणूक आहे. कालावधी संपूर्ण निवडणुका होत नाहीये ते माझ्या दृष्टीने चुकीचे असल्याचा वाटत आहे.

संजय राऊत यांचे मध्यवर्ती निवडणुकांचे वक्तव्य गंभीरपणे घेऊ नका. शिंदे गटात जाणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी हा प्रयत्न आहे. मध्यावधी निवडणुका लागायला काही कारण नाही. निवडणुका नाही लागल्या तर राऊत जाहीर माफी मागणार आहे का? कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...