आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्कार:खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना उघडकीस आली बलात्काराची घटना, 9 जणांना अटक

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका १२ वर्षीय मुलीवर ९ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली. या सर्व आरोपींचा ३० जुलैपर्यंत पीसीआर घेण्यात आला. कुख्यात गुंड रोशन कारगावकर याला एका खुनाच्या गुन्ह्यात २४ जुलैला अटक केली होती. २९ जुलैपर्यंत त्याचा पीसीआर होता. या खुनाच्या गुन्ह्यात चौकशी सुरू असताना राेशनने १९ जून ते १५ जुलै या काळात केलेल्या बलात्काराची कबुली दिली. घटनेचे गांभीर्य पाहता ग्रामीण पोलिसांनी ९ जणांना अटक केली.

नागपूर ग्रामीणच्या एसडीपीओ आणि तपास अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षीय मुलीचे आई-वडील शेतमजूर आहेत. उमरेडमधील आरोपी गजानन मुरस्कर हा पीडित मुलीच्या घराजवळच राहतो. त्याच्या घरी कुख्यात गुंड रोशन सदाशिव कारगावकर (वय २९, उमरेड) याचे नेहमी येणे-जाणे होते. रोशनची वाईट नजर मुलीवर पडली. १९ जूनला मुलीचे आई-वडील गावी गेले होते. दुपारी रोशन आणि गजानन मुरस्कर हे दोघे मुलीच्या घरी आले. त्यांनी मुलीला उचलून रोशनच्या घरी नेले. तेथे तिच्यावर प्रेमदास गाठीबांधे, गोविंदा नटे आणि सौरव रिठे यांनी बलात्कार केला. यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली. सायंकाळी ती शुद्धीवर आल्यानंतर रोशनने तिला ३०० रुपये देत याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री ११ वाजता रोशन पुन्हा तिच्या घरी आला आणि तिला घराच्या स्लॅबवर घेऊन गेला. तेथे राकेश शंकर महाकाळकर, नितेश फुकट, प्रदुम्न कुरुटकर, निखिल नरुले हे पाच जण दारू पित बसले होते. या पाचही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटे तिला रोशनने तिच्या घरी सोडले. तब्बल नऊ जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी आजारी पडली. १५ जुलैला रोशनने गावातील मित्रांसोबत मुलीवर पुन्हा सामूहिक बलात्कार केला.

बातम्या आणखी आहेत...