आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘सिऱ्याक्को स्टाइल’ संभोग करणे एका प्रियकराच्या जिवावर बेतले. संभोग करताना गळ्याभोवती दोरीचा फास आवळला गेल्याने प्रियकराचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरूवारी रात्री खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. जियाउद्दीन (वय २७, रा. टेकानाका) असे मृतकाचे नाव आहे. जियाउद्दीन हा अभियंता असून तो बेराजगार होता.
गेल्या काही वर्षांपासून त्याचे २६ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. ती खासगी कंपनीत कार्यरत आहे. गुरुवारी दुपारी जियाउद्दीन तरुणीला घेऊन दहेगाव रंगारी येथे आला. दहेगाव रंगारी येथे फिरल्यानंतर दोघेही लॉजवर गेले. त्यांनी खोली भाड्याने घेतली. त्यांनी मोबाइलवरच अश्लील चित्रपट बघितला. चित्रपटातील दृश्याप्रमाणे ‘सिऱ्याक्को स्टाइल' संभोग करण्याचे ठरविले. तरुणीने त्याचे हातपाय दोरीने बांधले. गळ्याभोवती दोरीही आवळली.
दोघांनी संभोग केला. संभोग केल्यानंतर तरुणी स्नानगृहात गेली. दहा मिनिटानंतर तरुणी स्नानगृहातून बाहेर आली. जियाउद्दीन हा खुर्चीवर होता. तिने त्याला आवाज दिला. जियाउद्दीन याने प्रतिसाद दिला नाही. तरूणीने जियाउद्दीनला जागे करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान जियाउद्दीन हा खुर्चीसह खाली पडला. त्याच्या गळ्याभोवती फास आवळल्याने त्याचा मृत्यू झालेला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.