आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:पती टीव्ही घेत नसल्याने दोन मुलांना विष देऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, नागपुरातील खळबळजनक घटना

नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिघांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू

टीव्ही खरेदीसाठी पत्नीने पतीकडे सारखा तगादा लावूनही पती ऐकत नसल्याने पत्नीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत दोन मुलांना विष दिले. त्यानंतर स्वतः विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नागपुरात शनिवारी उघडकीस आली. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

३४ वर्षीय आयेशा नसीम बेग व तिची दोन मुले अमन आणि हबीबा हे तिघेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी ही घटना नागपुरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी तिचा पती नसीम बेग याची चौकशी केल्यावर या घटनेतील खरे कारण पुढे आले. आयेशा व नसीमचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना अमन आणि हबीबा ही दोन मुले आहेत. नसीमचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे. मागील काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये टीव्ही खरेदी करण्यावरून वाद सुरू होता. शुक्रवारीदेखील तिने याच मुद्द्यावरून पतीसोबत वाद घातला. मात्र, लॉकडाऊनमुळे नसीम हा खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहात होता. शुक्रवारी नसीम घराबाहेर पडल्यावर आयेशाने दोन मुलांना कीटकनाशक देऊन ते स्वतःही घेतले. तिघांची प्रकृती बिघडल्यावर शेजाऱ्यांनी धावपळ करून नसीम याला माहिती दिली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आयेशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पत्ते खेळण्याच्या वादातून पुण्यात एकाचा खून

कोंढव्यातील आईमाता मंदिराजवळील मोकळ्या जागेत एका रखवालदाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शनिवारी भरदुपारी घडली. तपासातील प्राथमिक माहितीनुसार पत्ते खेळताना वाद झाल्याने हा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकाश खाजाप्पा खाणेकर (३४, रा. मूळ सोलापूर) असे मृताचे नाव आहे.प्रकाश दिवसा बिगारी काम करून रात्री तेथे रखवालदारी करतो. शनिवारी दुपारी पत्ते खेळताना काही जणांशी त्याचा वाद झाला. त्यामुळे त्याचा खून करण्यात आला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser