आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:मूल येथे बसच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

नागपुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मूल येथील बसस्थानक. - Divya Marathi
मूल येथील बसस्थानक.

मूल येथे

गडचिरोली येथे जाण्यासाठी मूल बसस्थानकावर आलेल्या एका महिलेला बसची धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मूल येथील बसस्थानकावर रविवारी दीड वाजताच्या सुमारास घडली. सरिता मनोज कर्रेवार (२६) रा. मारोडा असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मूल तालुक्यातील मारोडा येथील रहिवाशी सरिता कर्रेवार ही आपल्या पतीसोबत गडचिरोली येथे जाण्यासाठी मूल बसस्टँडवर आली होती. बस कुठे जाणार हे विचारण्यासाठी बस क्र. एमएच ४० एन ८९५१ या बसच्या समोर गेली असता अचानक तिला बसचा धक्का लागला. त्यामुळे ती खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पुढील तपास मूल पोलिस करत आहे. अद्याप बस चालकावर गुन्हा नोंदवला नाही. मूल बसस्टँडवर बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना असून, काही महिन्यापूर्वी बस अपघातात एका महिलेचा तर बस अंगावरून गेल्याने एका यांत्रिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

बातम्या आणखी आहेत...