आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात काम करताना वीज कोसळली:पारशिवणी तालुक्यातील बखारी येथील महिला ठार; 7 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारशिवणी तालुक्यातील बखारी येथे सोमवारी दुपारी मायाबाई कैलाश केवट (वय 45) या वीज पडून ठार झाल्या. तर त्यांच्यासोबतचे इतर 7 जण जखमी झाले. हे सर्व जण शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळली.

आतापर्यंतची दुसरी घटना

मायाबाई कैलाश केवट यांचा मृत्यू झाला असून यंदा जिल्ह्यांत वीज कोसळून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत माया यांच्यासह 6 महिला व दोन पुरुष चंद्रभान गोंडाळे यांच्या शेतात बियाणे लागवड व अन्य कामासाठी मजूरीने गेले होते.

जखमींवर वानखेडे हाॅस्पिटलमध्ये उपचार

तेव्हा दुपारी 3 वाजता दरम्यान वीजांच्या लखलखाटांसह पाऊस आला. त्यामुळे सहाही महिला व दोन पुरुष शेतातील कडूलिंबाच्या झाडाखाली आश्रयासाठी बसले. जवळच वीज कोसळल्यामुळे माया केवट जास्त जखमी झाली. त्यामुळे तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे दाखल केले. तिथे तपासून मृत घोषीत केले. अन्य जखमींना कन्हान येथील वानखेडे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.

18 जूनलाही कोसळली होती वीज

शनिवारी (ता. 18) जून रोजी जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वीज पडून तीन वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांसह बैलजोडी ठार झाले होते. योगेश रमेश पाठे (27, हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (34) व बाबाराव मुकाजी इंगळे(60, दोघेही मुक्तापूर) यांना इजा झाली.

बातम्या आणखी आहेत...