आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ जिल्हा आता क्राइमनगरी म्हणून पुढे येत आहे. गेल्या 24 तासांत दोन खून झालेत. त्यात जुन्या भांडणाचा राग मनात धरला म्हणून एकाला संपवण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत अनैतिक संबंधातून खून झाला.
गेल्या काही दिवसांपासून खुनांच्या घटनांमुळे यवतमाळ जिल्हा हादरला आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांत 21 खून झालेत. त्यामुळे पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
पहिली घटना...
बेडकीपुरा (जि. यवतमाळ) येथे जुन्या वादातून एक खून झाल्याचे समोर आले आहे. देवांश सावरकर असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर काही जणांनी चाकूने वार केले. यात घटनेत त्यांचा मृत्यू झाला. सावरकर यांचे पंधरा दिवसांपूर्वी एका तरुणासोबत भांडण झाले होते. त्या वादातूनच त्यांचा खून केल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्यात.
दुसरी घटना...
दुसऱ्या घटनेत अनैतिक संबंधातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. त्यात प्रवीण बर्डे याचा मृत्यू झाला. पंजाबराव कृषी विद्यापीठाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी रजनीश इंगळेसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्यात. इंगळेला प्रवीण आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून त्याने प्रवीणच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात प्रवीणचा मृत्यू झाला.
सतत खून
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत जवळपास एकवीस खून झाले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. किरकोळ घटनांवरून अनेकांचे राग विकोपाला जात आहेत. त्यात ते टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.