आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योग दिन:दमदार पावसावर योगाची संयमी मात; धावत्या मेट्रोमध्ये केली योगासने

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने धावत्या मेट्रोत योगासने केली. तर देशातल्या 75 प्रसिद्ध स्थळांसह नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर आंतरराष्ट्रीय योग दिवस केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. जनार्दन योग्याभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मेट्रोमध्ये योगा

माझी मेट्रोच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 मिनिटे योगासने करण्यात आली. "योगा ऑन व्हील' ही कार्यक्रमाची संकल्पना होती. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त विजय मुनीश्वर यांच्यासह मेट्रो तसेच विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात आला.

नागपुरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या "झिरो माइल्स' च्या नागपूरचाही समावेश होता. या योग दिनाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, नएसएस, एनसीसी, पोलिस,योग संस्था, नेहरू युवा केंद्र व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. सामान्य नागरिकाही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...