आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर महापालिकेच्या आपली बसच्या ताफ्यामध्ये आणखी 15 ई-बसचा समावेश होणार आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत या बसची खरेदी होईल. त्यातील 15 ए. सी. इलेक्ट्रिक बस नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहेत.
टाटा मोटर्सशी करार
15 इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी स्मार्ट सिटीतर्फे निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याता टाटा मोटर्सची निविदा कमी रकमेची असल्याने या बसच्या पुरवठ्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्यासंदर्भात टाटा मोटर्सचे आदित्य छाजेड यांच्यासोबत करार करण्यात आला.
170 इलेक्ट्रिक बस घेता येणार विकत
आता महापालिकेला 170 इलेक्ट्रिक बस विकत घेता येणार आहेत. पालिकेच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय करण्यात आला आहे. उर्वरित बस सीएनजीमध्ये परावर्तीत करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या 170 पैकी 40 गाड्यांमध्ये केंद्राचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. केंद्र सरकार 45 लाख प्रति गाडी देणार आहे. 15 गाड्या स्मार्ट सिटीकडून 100 टक्के अनुदानावर मिळणार आहे. तर 115 बसगाड्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकत घेण्यात येतील. या व्यतिरिक्त शहरांत 8 ठिकाणी चार्जिंग पॉइंट निवडण्यात आले आहेत.
361 पैकी 5 इलेक्ट्रिकवर
सध्या शहरात 361 गाड्या आहेत. त्यापैकी 5 इलेक्ट्रिकच्या आहे. लकडगंज डेपोत त्याचे चार्जिंग केले जाते. एकदा चार्ज झाल्यानंतर एक गाडी 150 किमी धावते. चार्जिंगसाठी साडेतीन तास लागतात. आता सीएनजी मिळणेही दुरापास्त झाल्याने या बसगाड्या बंद करीत इलेक्ट्रिक बसेस विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीन गडकरी इलेक्ट्रिक वाहनांसाठीही आग्रही आहेत. नागपुरात असले की ते इलेक्ट्रिक कारने फिरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.