आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:नागपुरात प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणावर हल्ला; फरार तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमाच्या त्रिकोणातून माजी प्रियकराने साथीदारांच्या मदतीने चाकूने वार करून युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. रोहित उर्फ बजरंग सुनील वाघ (वय 28 वर्षे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अनिल राकेश यादव व त्याच्या साथीदारांविरुद्ध तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत 32 वर्षीय तरुणी राहते. या तरुणीचे आधी अनिलसोबत मैत्री होती. गेल्या काही महिन्यांपासून तिने अनिलसोबत संबंध तोडले. तिची ऑटोचालक असलेल्या रोहितसोबत मैत्री झाली. त्यामुळे अनिल संतापला. अनिलने रोहितला गाठून तिच्यासोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध संपुष्टात न आणल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,अशी धमकी दिली.

रोहितने केले धमकीकडे दुर्लक्ष

रोहित धमकीकडे दुर्लक्ष केले. रविवारी रात्री रोहित हा तिच्या बांधकामाधीन इमारतीत गेला. तरुणी व रोहित हे पहिल्या माळ्याच्या पायरीवर बसून बोलत होते. याचवेळी तीन युवक तोंडाला दुपट्टा बांधून तेथे आले. त्यांच्या हातात चाकू बघून तरुणी तिथून पळाली. त्यानंतर तीघेही रोहितवर चाकूने सपासप वार करून पसार झाले.

तरुणीने कपिलनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जखमी रोहितला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणीने अनिल याच्यावर संशय व्यक्त केला आहे. आरोपी अनिल राकेश यादव हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.