आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:जन्मदात्या आईकडून मुलाची हत्या; दारुच्या नशेत धिंगाणा घालणे तरुणाच्या जिवावर बेतले

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगा दारुच्‍या आहारी गेल्‍याने नागपुरात आई आणि भावाने मिळून तरुणाची हत्‍या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम नानोट असे मृत तरुणाचे नाव असून तो रोज दारू पित होता. शुभम याचे नुकतेच लग्न झाले असून, त्याने आईकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र आईने पैशास नकार दिल्याने त्याने घरात दगडफेक करत तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापाच्या भरात शुभमच्या आईने विट फेकून मारली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे 23 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. त्याला दारुचे व्यसन होते. लग्न झाल्यानंतर मुलगा सुधारेल अशी आईला आशा होती. मात्र, लग्नानंतरही त्यात कोणतीही सुधारणा पाहायला मिळाली नाही. शुभम रोज दारु पिऊन वाद घालायचा आणि आईकडे वारंवार पैशांची मागणी करायचा. तर अलीकडेच शुभमने पत्नीच्या सोनोग्राफीसाठी आईकडे 5 हजारांची मागणी केली; मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरात दगडफेक आणि तोडफोड सुरु केली.

शुभम करीत असलेली तोडफोड पाहून त्‍याच्‍या आईचा राग अनावर झाला, आणि आईने त्याला विट फेकून मारली. यानंतर आईने मोठ्या मुलाला बोलावून घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात शुभमच्या डोक्याला इजा आणि गळा आवळल्याचे दिसुन आले आहे. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी करत, आई व भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नंदनवन पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...