आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बनावट मद्यसाठ्यासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील वारंगा ते अर्धापूर रोडवर पार्डी (म) शिवारात व पुसद येथे धाडी टाकून दोन चारचाकी वाहने, बनावट देशी-विदेशी दारू आण‍ि इतर साहित्य असा एकूण दहा लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे किनवट-ब व नांदेडच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचत कारवाई केली. यात पथकाने एक कार व ४३ बॉक्स बनावट देशी मद्य, २ बॉक्स बनावट विदेशी मद्य, ११,२७० बनावट लेबल, १०,५०० बनावट कॅप, २० लिटर मद्यार्क, १० लिटर ब्लेंड, चार मोबाइल व इतर साहित्याचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल अ. कानडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...