आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणी हत्या प्रकरण:संजय बियाणी हत्या प्रकरणातील 11आरोपींना न्यायालयीन कोठडी

नांदेड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या शारदानगर भागातील राहत्या घरासमोर ५ एप्रिल रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात नांदेड पोलिसांनी आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. यातील अकरा जणांची मोक्काअंतर्गत पोलीस कोठडी संपली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी रणजित मांजरमकर आणि सरहान चाऊस या दोघांना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात एकूण १३ आरोपी झाले आहेत. चोख पोलिस बंदोबस्तात या आरोपींना सोमवारी (२० जून)रोजी न्यायालयासमोर हजर केले होते.

बातम्या आणखी आहेत...