आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधा:शिळे अन्न खाल्ल्याने 152 जणांना नांदेडमध्ये विषबाधा

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील शिंपाळा येथे (ता.बिलोली) शिळे अन्न खाल्ल्याने १५२ जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (१४ डिसेंबर) दुपारनंतर उघडकीस आली. विषबाधा झालेल्यांपैकी १७ जणांना बिलोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी तेरा जणांना शुक्रवारी (१६ डिसेंबर) घरी पाठवण्यात आले. सध्या चार जणांवर उपचार सुरू आहे. तर दोघांना नांदेडला हलवल्याची माहिती मिळाली. बिलोली तालुक्यातील सगरोळीलगत असलेल्या शिंपाळ्यात १३ डिसेंबरला येथील एका बड्या व्यक्तीकडे गावातील ग्रामस्थांना जेवण्याचे निमंत्रण दिले होते. दुसऱ्या दिवशी उरलेलं शिल्लक अन्न काही जणांनी खाल्लं त्यानंतर त्यांना उलटी, पोटदुखी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव रामपुरे, डाॅ.विनोद माहुरे यांनी केले. त्यानंतर त्यांना बिलोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. विषबाधा झालेल्यांची संख्या हळूहळू १५२ पर्यंत पोहोचली. बिलोली येथील वैद्यकीय अधीक्षक डाॅ.नागेश लखमावार व त्यांच्या टीमने उपचार सुरू केले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...